भूम (प्रतिनिधी)-लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या व अधिकार काय हे असतात हे लक्षात घेतले पाहिजे. माजी आमदाराच्याव नातेवाईक यांच्या घरात यापूर्वी 25 वर्षे सत्ता होती. त्यावेळी विकास करता आला नाही. गिरवली गावाला आपणच पाणी पुरवले असे प्रतिपादन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

भुम नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि. 21 जानेवारी रोजी दुपारी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत बोलत होते. पुढे म्हणाले की 25 वर्षाच्या इतिहासात सत्ता तुमच्याच बाप दादाची होती तुम्ही विकास काय केला. स्वतःची गुत्तेदारीसाठी कामे केलीत असाही आरोप करत विकास काय असतो हे आम्ही 2016 पासून आपल्या मतदारसंघात नव्हे तर धाराशिव जिल्ह्यात दाखवून देण्याचे काम केलेला आहे असेही सांगितले.

यावेळी माजी उपनगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य संयोगिता गाढवे यांनी भूम तालुक्यासाठी भूम येथे सिटीस्कॅन व डायलिसिसचे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तर माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी भूम तालुका कृषी बाजार समितीसाठी मदत करण्याची मागणी केली.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर, माजी जि. प. सदस्य दत्ता साळुंखे, अण्णासाहेब देशमुख, दत्ता मोहिते, गौतम लटके, बिबीशन खामकर, उद्धव साळवे, दत्ता गायकवाड, रामकिसन गव्हाणे, नागनाथ नाईकवाडी, नितीन चेडे, बालाजी गुंजाळ, निलेश शेळवणे, गोफणे,युवराज हूंबे, साहिल गाढवे आदीसह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, भूम शहरातील नागरिक उपस्थित होते.


 
Top