तुळजापूर (प्रतिनिधी) -श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळेदिनी सोमवार दि. 22 जानेवारी रोजी जलयाञेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सोमवार 22 जानेवारी सकाळी येथील पापनाश तिर्थकुंडातील इंद्रायनी देविचे पुजन यजमान विनोद सोंजी, अनुराधा सोंजी यांच्या हस्ते महंत वाकोजीबुवा, जिल्हाधिकारी डाँ. सचिन ओंबासे त्यांच्या सौभाग्यवती, प्रशासकीय अधिकारी सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या उपस्थितीत पापनाश कुंडातील पविञ जल पाच कलशात घेवुन त्याचे पुजन करण्यात आले. कलश यजमान यांच्या खांद्यावर देवुन व सुवासनी कुमारीका घेवुन जलयाञा जलकुंभाच्या मिरवणूक सोहळ्यास सुरुवात झाली.
मिरवणूक छञपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी रोड, मंदीर महाध्दार येथुन ही मिरवणूक सकाळी 11 वा. मंदिरात पोहचली. सुवासनीनी कलशात आणण्याला पाण्याने मंदिर गाभारा स्वछ धुतला. नंतर जलयाञेतील सहभागी सुवासनीचा मंदिर संस्थातर्फे हळदीकुंकु लावुन खणनारळाने ओटी भरुन सन्मान केला. श्रीतुळजाभवानी मातेस अभिषेक करुन नंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. देविची आरती करुन सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली. सांयकाळी देविजीस अभिषेक केल्यानंतर मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला. नंतर महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर शांकभरी नवराञोत्सवातील पाचव्या माळेच्या धार्मिक विधीचा सांगता झाला.