धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरामध्ये मागील तीन दिवसांपासून श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव 2024 सुरू असून आज चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्याचा जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने, श्रीमती वर्षा मरवाळीकर समन्वयक कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थपाक व कृषि विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यामध्ये धाराशिव तालुक्यातील आबाजी शिवाजी यादव लासोना, अजिंक्य राजेंद्र मगर वाघोली, महेश सोमनाथ जमाले कसबे तडवळा, अनिता बाबासाहेब चव्हाण करजखेडा,अण्णा काका रणदिवे मेडशिंगा. तुळजापूर तालुक्यातील शिवमूर्ती शिवाजी साठे काक्रंबा, महादेव दत्तू सोनटक्के इटकल, सुदर्शन शिवाजी जाधव गंजेवाडी, विशाल रमेश वडणे माळुंब्रा, अजय कुमार पवार शहापूर. इोहारा तालुक्यातील- नागेश देविदास शिंदे जेवळी, संपर्क करून मल्लिनाथ शरनापा चिंचणसुरे आष्टा कासार, सोमनाथ अशोक भोंडवे हिप्परगा सय्यद, राजकुमार रामराव पाटील आरणी, महेश बळवंत पाटील मुर्षदपुर. उमरगा तालुक्यातील ज्ञानेश्वर दत्तू दस मे काळनिंबला, संजय बाबुराव पाटील कंटेकुर, शाहूराज बाबुराव पाटील मळगी, नागनाथ आप्पाराव हिंडले सुपतगाव, बाबासाहेब खंडागळे मुरूम. कलंब तालुक्यातील बाळासाहेब बापूराव पाटील माळकरंजा, सुरज शिंदे सात्रा, हनुमंत फुलचंद मुंडे वडगाव ज, उमाकांत चंद्रसेन गिराम रायगव्हाण, हरिदास बळीराम माळी जवळा खु, लक्ष्मण अरुण अडसूळ ईटकुर, बापूराव गजेंद्र नहाने देव धानोरा, श्रीकांत गोविंदराव भिसे एकुर्गा. वाशी तालुक्यातील कृष्णा बिभीषण हाके सरमकुंडी, भाऊसाहेब भागवत जोगदंड जोगदंड पिंपळगाव क, दत्तात्रय महादेव कागदे वाशी, गीता संभाजी भांडवले वाशी, विश्वास उंद्रे वाशी. भूम तालुका-लिंबराज महादेव गोरे अंतरगाव, दयानंद मोठे पाटील अंजन सोडा, भर तरी त्र्यंबक टाळके राळेसांगवी, दादा बबन गाढवे, बेदरवाडी, डॉक्टर भरत केरबा दळवे पाटसांगवी. परंडा तालुक्यातील- उत्कर्ष आप्पासाहेब देशमुख डोंजा, अंकुश उत्तम होरे खासगाव, साधना संभाजी बानगुडे वाकडी, अंकुश जगन्नाथ नाळे खानापूर, किरण दादासाहेब गवारे जवळा नि. यांचा समावेश होता.