धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा नामविस्तार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

याप्रसंगी सुशिलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. रत्नाकर मस्के यांनी उपस्थितांना नामविस्तार दिनानिमित्त मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.प्रकाश कांबळे हे होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री बबन सूर्यवंशी प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.मारुती लोंढे व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top