धाराशिव (प्रतिनिधी)-एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यमगरवाडी, तालुका तुळजापूर येथे खाषाबा जाधव जयंती, राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करणेत आला. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले.
त्या नंतर क्रीडा स्पर्धा घेणेत आल्या. क्रीडा स्पर्धेचे उदघाटन विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर यांनी केले.मुलां मुलींच्या तीन गटात मॅरेथॉन स्पर्धा घेणेत आली. पहिली ते चौथी च्या मुली गटातून प्रथम क्रमांक प्रांजली मोहिते द्वितीय वैष्णवी गायकवाड, तृतीय प्राजक्ता आलमले आले. मुले गटातून सत्यजित जाधव, शैलेश वीर, त्रितिय नैतिक गावडे,पाचवी ते आठवी वर्ग गटातून मुलीमधून प्रथम अक्षरा पवार,द्वितीय प्रीती राठोड, तृतीय अबोली माने मुलातून ज्योतीराम पवार, द्वितीय अमित माडेवार,तृतीय प्रेम सुरवसे, आठवी ते दहावी गटातून मुलातून प्रथम ओंकार भोसले, द्वितीय प्रवीण जाधव तृतीय व्यंकटेश कुऱ्हाडे, मुलितून प्रथम अश्विनी चव्हाण द्वितीय मनीषा राठोड. अपंग गटातून प्रथम शिंदे प्रथम आला.या स्पर्धा घेणेसाठी माऊली भूतेकर, बालाजी क्षीरसागर, महादेव शेंडगे, हरीश मगदूम,अनिल घुगे,अशोक बनकर, अण्णासाहेब मगर, दयानंद भडांगे, प्रणिता शेट कार,खंडू काळे, मयूर रेड्डी, दत्ता भोजने यांनी प्रयत्न केले.अतिशय आनंदी वातावरणात क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.