भूम (प्रतिनिधी)-येथील समस्त कोष्टी समाजाच आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या उत्सवा निमित्त दहाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडप उभारणीचे काम सुरू झाले. या मंडप उभारणीचा शुभारंभ समाजातील जेष्ठाच्या हस्ते करण्यात आला.

दिनांक 18 जानेवारीपासून शाकंभरी महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भूम येथील समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह गेल्या दहा वर्षापासून आयोजित केला जात आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ धार्मिक विधीनुसार रविवार दि. 14 जानेवारी 2024 रोजी करण्यात आला. दि. 18 जानेवारी ते 25 जानेवारी या सप्ताह दरम्यान हभप स्वरगंधर्व प्रकाश जंजिरे, वारकरी भूषण एकनाथ चत्तर शास्त्री, विनोदाचार्य दयानंद कोरेगावकर,  रामायणचार्य माधव रसाळ, धर्मगुरू अमृताश्रम जोशी, जयवंत बोधले,  तुकाराम मेहुणकर महाराज यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. समारोपाच्या दिवशी हभप गोविंद गायकवाड महाराज आळंदीकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे .तसेच काकडा, भजन, देवांग, पुराण, गाथा भजन, तुळशी रामायण, हरिपाठ, कीर्तनचे कार्यक्रम होणार आहेत.

मंडप उभारणीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान समाजातील जेष्ठ बांधव नारायण बागडे, अंबादास वरवडे, पांडुरंग वरवडे, आबासाहेब नवले, योगेश असलकर, विठ्ठल बागडे, पत्रकार शंकर खामकर, भैय्या टकले, राज उपरे, प्रकाश बागडे, बारीकराव पाकले, ज्ञानेश्वर टकले, संदीप खामकर,  राजश्री वरवडे, सौ उज्वला बागडे,  सत्यभामा बोत्रे, साधना कोकणे, अलका आलगट आदींची उपस्थिती होती.


 
Top