तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील आर्य चौक येथील श्रीराम मंदिरात श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवार दि22रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोमवार दि. 22) जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वा. होमाची पूर्णाहुती दिली गेली. यावेळी यजमानांसह मंदीर पुजारी, काँग्रेसचे माजीमंञी आमधुकरचव्हान यावेळी उपस्थितीत होते.नंतर. श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना समस्त राम भक्तांचा उपस्थितीत करण्यात आला. नंतर शहरवासीयांच्या वतीने दुपारी 12:30वा. भगवती विहीर ते आर्य चौक परिसरात महाप्रसाद महाप्रसाद  वाटप करण्यात आला.


 
Top