धाराशिव (प्रतिनिधी)-  संजीवनी विद्यालय, चिलवडी ता.जि.धाराशिव येथे विद्यालयात  इ. 5 वी ते 10 वी शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी विठ्ठल विनायक तांबे हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत  (विक्री कर निरीक्षक) पदी नियुक्तबद्दल विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.के.वाय.जाधव, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भोसले हायस्कूल, धाराशिवचे माजी पर्यवेक्षक बी.जी. जाधव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा शिंदे  यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.मान्यवरांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थी विठ्ठल तांबे यांचा शाल, श्रीफळ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. यानंतर यशस्वी विद्यार्थी विठ्ठल तांबेंने प्रेरणादायक भाषण केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन नानासाहेब बोराडे यांनी केले. तर आभार  बी.जे. शिंदे यांनी मानले.


 
Top