धाराशिव (प्रतिनिधी)-येत्या शनिवारपासून पुढील 10 दिवस राजस्थानी सत्संग परिवार, राजस्थानी महिला मंडळ व सकल राजस्थानी समाजाच्यावतीने शहरातील बालाजी मंदिरात श्रीराम कथा, राम चरित्र मानस पाठचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, 13 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथपूजन, मंगलाचरण व शोभायात्रेने कथा शुभारंभ होणार आहे. 14 ते 21 जानेवारी या कालावधीत रामायणातील विविध कथा होणार आहे. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत दीपोत्सव, रात्री 9 ते 11 सुंदरकांड पाठ व काल्याचे किर्तन होवून कथा समाप्ती तर सोमवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपस्थित भाविकांना दाखविण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाने रामकथेचा समारोप होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या श्रीराम कथा, राम चरित्र मानस पाठ कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


 
Top