परंडा (प्रतिनिधी) - उत्तम स्वास्थ्य ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे सर्वांनी आपले आरोग्य सु व्यवस्थित ठेवले पाहिजे तरच आपण सकारात्मक कार्य करू शकतो देशाच्या भवितव्यासाठी आजचे तरुण निरोगी असणे महत्त्वाचे आहे.त्यांना चांगल्या आहाराची गरज आहे. चांगल्या विचाराची गरज आहे  असे मत उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राणीशास्त्र विभाग  आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ विश्वेश कुलकर्णी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, प्राणीशास्त्र विभागाचे प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पी. बी.जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.जी. आर. यादव, फार्मसी अधिकारी शिंदे. टी. एन., स्टाफ नर्स एस.एन. गायकवाड, समुपदेशक अमोल वांबुरकर, तानाजी गुंजाळ, टेक्निशियन शिकलकर, नोफेल रमजान तुटके, प्राध्यापिका शेख एम आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर गोरे पाटील, डॉ. सचिन चव्हाण, डॉ अक्षय घुमरे, प्रा. सातव, मोरवे, नलवडे, कीर्ती, प्रतिभा माने, सूर्यवंशी यांच्यासह अनेक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु मिसाळ जेतवणी या विद्यार्थीनीने केले तर डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागातील कर्मचारी प्रा तब्बसुम शेख, लॅब असिस्टंट जयवंत देशमुख आणि दत्ता आत्तकर यांनी परिश्रम घेतले. 
Top