तुळजापूर (प्रतिनिधी)-  युवास्पंदन व  व मराठवाडा संस्थेच्या वतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा ,स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेत परभणीची कु. आवरगंड तेजस्विनी व बारामतीचा जांबले वैष्णव वक्ता महाराष्ट्राचा चे मानकरी ठरली. या स्पर्धचे उदघाटन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षिस वितरण माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सचिव धर्मेंद्र प्रधान उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.सचिन आंम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे- गट क्रमांक एक इ. 3 री ते इ. 4 थी प्रथम आवरगंड तेजस्विनी कल्याण परभणी, द्वितीय शेंडगे विघ्नेश इचलकरंजी, पाटील संजना काटगाव, चतुर्थ पाटील संस्कृती औसा, पाचवा सावळकर आवी सोलापूर, सावे पवार रोहित येडोळा, उत्तेजनार्थ टोंगळे सिद्धांत नांदेड, निकम सृष्टी सोलापूर, घोडके प्रगती काडगाव, पवार रुद्र मुंबई, महाजन अपेक्षा कंळब.

गट दोन इ.5वी ते इ.7वी प्रथम शेंडगे उत्कर्ष इचलकरंजी, द्वितीय धस प्रणिता तांदुळवाडी, तृतीय नागापुरे स्वरूप, चतुर्थी जाधव अनन्या तामलवाडी, पाचवा शहा केवली कुंथलगिरी, सहावा गंधोरे प्रेरणा धाराशिव,  उत्तेजनार्थ नवघरे अभिराज, काशीद आदित्य, ढेसणे कल्याणी, मुंगळे दिशा बेंबळी, जांभळे आसरा दौंड.

गट तिसरा इयत्ता आठवी ते दहावी प्रथम जांभळे वैष्णव बारामती, द्वितीय कुमारी दस प्रणाली, तृतीय कुमारी सोनवणे अमृता केज, चतुर्थ हेगडे यशराज सातारा, पाचवा धारवडकर सिद्धी बीड, सहावा महाडिक रोहन भूम, उत्तेजनार्थ भोसले शिवतेज पंढरपूर, कुमारी जाधव श्रविका बार्शी, कुमारी यादव मयुरी धाराशिव, कुमारी मोहेकर अस्मिता अंबाजोगाई, नावडे प्रथमेश लातूर यांनी तर तिनेही गटातून प्रोत्साहन पर कुमारी संस्कृती पवार मुंबई, श्रवण शिंदे, सोहम मस्के, आरुषी दिवटे, तन्वी खडके, सायली जाधव, आरोही लिमकर, आदर्श क्षीरसागर, माहेनूर शेख, दांगट भक्ती तुळजापूर, मोटे सुषमा, कपाळे श्रावणी बेंबळी यांनी पारितोषिके प्राप्त केली.

माजी जिल्हाधिकारी कै.डी.आर बनसोड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्राथमिक गटातील फिरती चषक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटगाव या शाळेने तर कै. दत्तात्रय गवळी यांच्या स्मरणात दिला जाणारा माध्यमिक गटातील फिरती ढाल विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती यांनी पटकावला. प्रास्ताविक युवास्पंदनचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी तर सूत्रसंचालन शिवशंकर जळकोटे व तानाजी म्हेत्रे यांनी केले. आभार किरण हंगरगेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी निरंजन डाके, विशाल सुरवसे, शिवशंकर भारती, देवेंद्र पवार, संदीप गंगणे, जयराज सूर्यवंशी, उज्वला जोशी, जयमला वटणे, ज्ञानेश्वरी शिंदे ,भाग्यश्री कावरे, अनंत कावरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top