धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत  यांच्या मार्फत  अंशकालीन अतिथी निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांच्या सेवासातत्य  या मागणीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन सादर केले. निवेदनात शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी आग्रही भूमिका धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघ, जिल्हाकार्याध्यक्ष शिवाजी  भोसले, जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हा सचिव शेषनाथ वाघ,कलानिदेशक प्रतिनिधी रविकिरण तिगाडे यांनी पालकमंत्री सावंत यांच्या समोर मांडली. यावेळी जिल्हाभरातून कलानिदेशक व कलाध्यापक उपस्थित होते.


 
Top