सोलापूर (प्रतिनिधी)-डिसेंबर 2023 मध्ये सोलापूर विभागाची प्रभावी कामगिरी, विविध मालवाहतुकीच्या श्रेणींमध्ये लक्षणीय कामगिरी आणि सतत वाढ दर्शवणारी. डिसेंबर 2023 मध्ये सोलापूर विभागाने माल वाहतुकीत रु. 60.02 कोटी ची कमाई नोंदवली. ही कमाई मागील वर्षीय डिसेंबर महिन्याचे तुलनेत. 56.16 आहे, ज्यात +6.87% ची वाढ आहे.
2023 डिसेंबर मध्ये प्राप्त झालेले 0.636 चे मूळ लोडिंग मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत -9.24 % कमी दर्शवली, ज्याने 0.701 नोंदवले होते. एकत्रितपणे, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सोलापूर विभागाने रु. 427.81 कोटी ची नोंद केली. ही आता पर्यंतची सर्वोत्तम कमाई आहे. विभागाने विविध कार्गो श्रेणी देखील प्राप्त केल्या:
सिमेंट वाहतुकीतून 125 रेक लोड करून रु. 23.97 कोटी, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या रु.21.44 कोटी च्या तुलनेत प्रभावी 11.84% वाढ दाखवली.क्लिंकर वाहतुकीतून 54 रेक लोड करून रु. 16.97 कोटी, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या रु.14.27 कोटी च्या तुलनेत प्रभावी 18.89% वाढ दाखवली.
साखर ट्रॅफिक मध्ये एकूण 26 रेक लोड करून कमाई रु. 17.27 कोटीची नोंद केली. ऑटोमोबाईल वाहतुकीतून एकूण 6 रेक लोड करून 0.82 कोटीची नोंद केली. सोया डीओसी ( डी-ऑईल केक) ची 3 मिनी रके लातूर वरून लोड करून अतिरिक्त . 0.61 कोटी ची नोंद केली. मका ची 1 रके लोड करून . 0.09 कोटी ची अतिरिक्त कमाई केली आहे.