तुळजापूर  (प्रतिनिधी)- शहरातील भवानी रोड ते आर्य चौक या 12 मीटर रस्त्याच्या रुंदीकरणास नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. सदरील मंजुरीसाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुरावाला यश आले आहे अशी माहिती युवा नेते विनोद गंगणे व माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली. 

सदरच्या रस्त्याची भूसंपदाची प्रक्रिया यापुढे करणे सुलभ होईल व तुळजापूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यापैकी एक असा रस्ता होणार असून त्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे.  येणाऱ्या भाविकांना मूलभूत व पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. नगरपरिषद अंतर्गत भवानी रोड, आर्य चौक, किसान चौक 12 मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन बाबीचे नावातील दुरुस्ती बाबतचे राज्यपत्रातील शुद्धीकरण करण्यास महाराष्ट्र शासनातर्फे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे भूसंपादन प्रक्रियेतील कारवाईस गती येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुरावामुळे शहराच्या विकासाला चालना मिळत आहे अशी भावना शहरवासियांच्या वतीने व भाविकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. सदरील माहीती ही युवा नेते विनोद गंगणे तथा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.


 
Top