कळंब (प्रतिनिधी)-कळंब येथील  जन जागृती प्रा. विद्यालय येथे  26 जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डिकसळ ग्रामपंचायतचे उपसरपंच हरिभाऊ कुंभार नानासाहेब धाकतोडे व शाळेचे मुख्याध्यापक रोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिकसळ ग्रामपंचायतचे सदस्य जनक जाधव,इम्रान मुल्ला,मुबिन मनियार इर्शाद रफिक सय्यद, शुभा मस्के, प्रदीप गायकवाड, सचिन काळे, व विकास कदम हे उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धेचे वितरण देखील करण्यात आले. प्रथम क्रमांक नंदिनी तुपारे इ 4 थी या विद्यार्थिनीला पहिले पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक अलीना सय्यद इ 2 री हिला देण्यात आले. तर तृतीय पारितोषिक संजना सरवदे या विद्यार्थिनीला देण्यात आले. या शाळेतील कुंभार सर, चौधरी सर, शेख सर, नरटे सर यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top