धाराशिव (प्रतिनिधी)-पोलिस मुख्यालयातील 14 पोलिस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात बदल्या केल्या आहेत.  यामध्ये दोन पोलिस निरीक्षकांसह दोन पोलिस उपनिरीक्षक तर 10 सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदेश काढले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव पोलिस दलात बदल केले आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या नेमणुका केल्या. आनंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बाळासाहेब पवार, तुळजापूर रविंद्र खांडेकर, मुरूम येथे सहाय्यक निरीक्षक संदीप दहिफळे, येरमाळा येथे सहाय्यक निरीक्षक विकास हजारे यासह इतर नेमणुकीचे आदेश दिले आहेत. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून आनंदनगर भागवत नागरगोजे, तुळजापूर तात्या भालेराव, आनंदनगर राम घाडगे, वाशी सचिन खटके, उमरगा अमोल मोरे, नळदुर्ग विजय आटोळे, परंडा श्रीनिवास सावंत, कळंब प्रभाव पुंडगे, नळदुर्ग पोलिस उपनिरीक्षक संतोष गीते, पोलिस उपनिरीक्षक प्रताप गर्जे यांची बेंबळी पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.


 
Top