धाराशिव (प्रतिनिधी)-ऑलम्पिक वीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून शिंगोली आश्रमशाळेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक खंडू रंगनाथ पडवळ साहेब, पर्यवेक्षक शेख अब्बास अली, क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक पडवळ यांनी खाशाबा दादासाहेब जाधव यांच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांचा जन्म कृष्णाकाठी सातारा येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वडीलाकडून, आजोबा कडून कुस्तीचे धडे मिळाले. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी कुस्तीसाठी अतोनात व्यायाम करून शरीर कमावले, कोल्हापूरला कॉलेजला असताना त्यांनी आपला कुस्तीचा ठसा उमटवून दाखवला, त्याच आधारे त्यांच्या प्राचार्यांनी व कुस्तीची आवड असणाऱ्यांनी त्यांना मदत केली, त्या मदतीवर त्यांनी ओलंपिक मध्ये ब्रांज पदक पटकावले. भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. पाटील रत्नाकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी नागनाथ पाटील सर, सूर्यकांत बर्दापुरे, चंद्रकांत जाधव, दीपक खबुले, प्रशांत राठोड, सचिन राठोड, विशाल राठोड, श्रीमती ज्योती साने मॅडम, ज्योती राठोड मॅडम, श्रद्धा सूर्यवंशी मॅडम व कर्मचारी गोविंद बनसोडे, सचिन माळी, सागर सूर्यवंशी, अमोल जगताप, मस्के भिकाजी, लिंगा आडे, रेवा चव्हाण, इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सतीश कुंभार सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.