धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील एमआयडीसी येथिल काशिबा चौक येथे संत काशीबा महाराज जयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्या वतीने प्रतिमेचे पुजन धाराशिव तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, नगरसेवक युवराज नळे, सोमनाथ गुरव, माळी समाजाचे राजाभाऊ माळी, भालचंद्र धारूरकर यांच्या हस्ते पुजन करून पुण्यतिथी साजरी केली. 

याप्रसंगी अँड प्रजित नळेगावकर,अँड प्रशांत खंडाळकर, पी. जी. कदम, अँड अतुल पाटील, सुनिल तिर्थकर, प्रमोद बचाटे, श्रीनिवास पाटील, रवि तिर्थकर, महेश मोटे, गोविंद ढिगीकर, अंबादास आवटे, वैभव फुलारी, विवेक गुरव, प्रणव तिर्थकर, मदन पवार, संबुदेव खटिंग, प्रताप आडसुळ, वैभव गवाड, त्र्यंबक सिंदफळकर यांच्यासह गुरव समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top