धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात 5 दिवस सुरू असणाऱ्या या हिरकणी महोत्सवात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे 150 स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. महिलांसाठी उद्योजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन, गीत रामायण यासारखे कार्यक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा आणि दीपप्रज्वलनाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी देवीची नऊ रूपे नृत्य अविष्कारामध्ये सादर करणाऱ्या 40 जणांच्या ताफ्याचा नवदुर्गा हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच जिल्ह्यातील पीएमईजीपी व सीएमईजीपीच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेल्या यशस्वी हिरकण्यांचा सन्मानही करण्यात आला.

लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी संक्रांतीचे वाण म्हणून प्रभू श्रीरामांच्या 10,000 मूर्ती महिलांना वाण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, सौ. महिमा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सुरेश देशमुख,  पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top