धाराशिव (प्रतिनिधी)-आयोध्यातील नवनिर्मित भव्य मंदिरात 22 जानेवारीला श्री प्रभू श्री रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पार पडत आहे. त्यानिमित्त अयोध्यातून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलाशाची ढोकी येथे शुभयात्रा काढण्यात आली. यावेळी ढोकी येथील हनुमान मंदिरात महाआरती व अक्षता कलशाचे पूजन भाजपाचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पूजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजरात जय श्री रामाच्या घोषात गाव राममय झाले. यावेळी गावातील स्थान मित्राला प्रभू श्रीराम चंद्राच्या पंचधातूच्या श्रीराम मूर्ती व मंगल अक्षता वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे अनिल घाडगे, गजानन शिंदे, बालाजी लंगडे, मकरंद पाटील, अनंतराव देशमुख, झुंबर बोडके, पापा देशमुख, सतीश बाप्पा देशमुख, प्रभाकर गाढवे, संग्राम देशमुख, गुणवंत सुतार, दिलीप सिंग तिवारी, विकास देशपांडे, काका पाटील, दिलीप धाकपाडे, विलास रसाळ, पंकज देशपांडे, शशिकांत देशमुख आदी सह राम भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.