धाराशिव (प्रतिनिधी)-  झी टीव्ही  एकापेक्षा एक नृत्य स्पर्धा विजेती तसेच गाजत असलेले नाटक 'मर्डरवाले कुलकर्णी ' अनेक मालिका नाटकात भुमिका करणारी अभिनेत्री सुकन्या काळण, रौशन मरार यांचे श्री तुळजाभवानी मंदीर तुळजापूर येथे कुलाचार करण्यासाठी आले असता देवीची प्रतिमा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा प्रमुख शेषनाथ वाघ, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे, अभाविप कार्यकर्ते सत्यहरी वाघ, पुजारी राम छत्रे, अनंत छत्रे उपस्थित होते.


 
Top