धाराशिव (प्रतिनिधी)-नवी मुंबई येथे साफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे विजय मच्छिंद्र सूर्यवंशी (वय 54) यांचे 15 जानेवारी 2024 च्या पहाटे मुंबईत अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर धाराशिव येथील कपिलधार स्मशानभुमीमध्ये रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन बागल सह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 

विजय सुर्यवंशी धाराशिवमध्ये समता नगर येथे राहत असतं. नोकरी निमित्याने नवी मुंबई येथे कार्यरत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वडील,पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. जुनी पिढीतील शिक्षक तुळशीदास वैद्य यांचे ते भाच्चे होते.  
Top