धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील मुलांसाठी विद्यार्थ्यांचे मेकॅनिकल कंपनीला मॉडेल डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणाऱ्या गरजेप्रमाणे नुकताच ऑटोकॅड सॉफ्टवेअर कोर्स घेण्यात आला. सलग अठरा दिवस चाललेल्या कोर्स मधून उत्तमरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने, अकॅडमिक डिन तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, डिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ए. झेड. पटेल, वर्कशॉप सुप्रीटेंडंट  प्रा.डी.एच.निंबाळकर, पी.जी.लॅब इन्चार्ज प्रा.पी.एच.जैन  यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात डॉ. दाते सर यांनी हा कोर्स किती महत्त्वाचा आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. 

मेकॅनिकल शाखेतील आपल्या मागील तीन-चार वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारचे मेकॅनिकल शाखेसाठी डिझाईन साठी लागणाऱ्या  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चे कोर्स केल्यामुळे त्यांना मर्सिडीज बेंज, मारुती सुझुकी, हिरो मोटार, महिंद्रा, किर्लोस्कर, फोर्स मोटार यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये सर्वोच्च पॅकेज मिळाले. त्याचप्रमाणे आपणाला ह्या कोर्स फायदा होऊन आपणासही चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टीची पूर्तता महाविद्यालय करत असल्यामुळे आमचा प्लेसमेंटचा आकडा अत्यंत चांगला आहे. अठरा दिवसाच्या कोर्स मधून प्रत्येक दिवशी दोन तास क्लासरूम सेशन व चार तास प्रात्यक्षिक घेण्यात आले असून हे विद्यार्थी आज कंपनीला लागणारे ड्रॉईंग तयार करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच परफेक्शन आले याची खात्री आहे. या कोर्समध्ये एकूण 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांना कॅड सेंटरचे प्रशिक्षक फिरोज मणियार यांनी प्रशिक्षण दिले. यंत्र विभागातर्फे प्रा. एस. पी बिरादार, प्रा. यु. जे. जाधव, प्रा.बी.जी.कदम, एम. जी. चौधरी, जयसिंग ठाकूर यांनी काम पाहिले.


 
Top