धाराशिव (प्रतिनिधी)-वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य सुत्रधार आरोपी विजय दंडनाईक यांना अखेर शरणागती पत्कारल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. धाराशिव येथील कोर्टाने त्यांना 25 जानेवारी गुरूवार पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी शोधमोहीम व धाडसत्र सुरू केल्यावर दंडनाईक हे स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले आहेत. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली व कोर्टासमोर हजर करण्यात आले. गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 6 महिने ते फरार होते. त्यांचा जामीन जिल्हा व संभाजीनगर व उच्च न्यायालयाने नाकारला आहे.

वसंतदादा बँक घोटाळ्यात जवळपास 18 आरेपी पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात  पोलिसांना यश आलेले नव्हते. या घोटाळ्यातील ही पहिली अटक आहे, पोलिसांनी 4 दिवसापूर्वी दंडनाईक यांचे घर, कार्यालयात धाड टाकत शोध घेतला. तसेच इतर आरोपीचा ही ठावठिकाणा शोधला मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर मुसक्या आवळल्यानंतर ते पोलिसांसमोर हजर झाले व त्यांना अटक करण्यात आली. 


 
Top