भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे शहरात एस.टी स्टॅन्डच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आलेले असताना काही व्यापाऱ्यांनी पुर्वीच्या ठिकाणी नवीन एस. टी. स्टॅन्ड असावे अशी मागणी केली असताना बाहेरून आलेल्या पालकमंत्र्यांनी भूमिपुत्रांना धमक्या दिल्या. जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त करून पालकमंत्र्यांनी आपल्यावर टिका करताना 15 वर्षे मतदारसंघात विकास केला नाही? काय झक मारत होता का? याला पण माजी आमदार राहुल मोटे यांनी जोरदार प्रतिउत्तर पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.

भूम येथील शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे शहरात एस.टी डेपो च्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आलेले होते त्यावेळी त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर पंधरा वर्षे मतदारसंघात विकास केला नाही काय झक मारत होता का? अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना गेल्या पंधरा वर्षात सिंचन क्षेत्रात जलपूजनापासून ते भूमिपूजन पर्यंत सीना कोळेगाव प्रकल्प सोडला तर या मतदारसंघात 500 कोटी रुपये सिंचनासाठी खर्च केलेला आहे. आणि हे शंभर टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. असे माजी आमदार मोटे यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना भूम तालुक्यात दोन वेळेस आमदार व दोन वेळेस मंत्री झालेल्या व्यक्तींने साधा तलाव केला नाही. त्यांनी काय झक मारली का? असे प्रतिउत्तर माजी आमदार राहुल मोटे यांनी दिले. आपल्या कारर्किदीमध्ये केलेली कामे माजी आमदार मोटे यांनी सांगितले. 


विकासाच्या आड

विकासाच्या आड येणारे तुम्हीच आहेत असे म्हणत माजी आमदार मोटे यांनी  डॉ. राहुल घुले यांनी रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी भूम ते डहाणू बस सेवा सुरू केली होती. ती बंद पाडून तुम्हीच विकासाला आडवे आल्याचें त्यांनी यावेळी वक्तव्य केले. तसेच गेल्या आठ वर्षापासून तुम्ही आमदार दोनदा कॅबिनेट मंत्रीपदी, दोनदा पालकमंत्री  असूनही आपण मतदारसंघात उजनीचे पाणी मतदारसंघात आणू शकले नाही. तसेच 133 केवी, एखादा तलाव करू शकले नाही मग काय झक मारायला कॅबिनेट मंत्री झाला होता का अशी बोचरी टीका त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. आजच्या पत्रकार परिषद मध्ये हल्ली शांत स्वभावाचे समजले जाणारे  राहुल मोटे यांना आक्रमक होताना दिसले.


जनता दाखवून देईल

एसटी भूमिपूजन प्रसंगी तानाजी सावंत यांनी भाषणात मी उडत्याची मोजणारा आहे असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राहुल मोटे यांनी तुला जमिनीवरच्या लोकांची भावना कळेना तू निघाला उडत्याची मोजायला! तुला यावेळी जनता काय आहे ते चांगलं दाखवणार आहे असे प्रत्युत्तर दिले. भूमिपूजनाच्या प्रसंगी तानाजी सावंत यांनी धमकी वजा विरोधकांना इशारा दिला होता की  “विकासाच्या आड आल्यास तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघू देणार नाही ! त्यावर उत्तर देताना राहुल मोटे यांनी तुला तुझ्या गावातून तालुक्यातून जनतेने आधीच हाकलेला आहे आणि तू बाहेरून येऊन आम्हा भूमिपुत्रांना धमक्या देतोस, वेळ येऊ द्या की कोण कोणाला बाहेर निघू देत नाही हे तुम्हाला मतदार संघाची जनताच दाखवून देईल.


 
Top