धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तेर-हिंगळजवाडी-वाणेवाडी या रु.6.40 कोटीच्या रस्त्याच्या कामाचा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरील शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत मागणी केली होती. या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने शेतकऱ्यांनी याबाबत आभार व्यक्त केले. लवकरच हे काम पूर्ण होईल. सदरील कामाच्या दर्जाबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना सक्त सूचना दिल्या आहेत.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, तेरच्या सरपंच दीदीताई काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, रमेश भोसले, बबलू मोमीन, प्रशांत फंड, नवनाथ पसारे, नाना मस्के, पिंटू मस्के, प्रशांत हेगडकर व ग्रामस्थांची उपस्थिती होती.


 
Top