धाराशिव (प्रतिनिधी)-अहमदनगर येथून लातूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार प्रमोदकुमार काकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याचा अतिरिक्त पदभारही काकडे यांच्याकडेच असणार आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणचा पदभार सोमवारी स्वीकारला.  याबाबतचे बदली आदेश राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे नूतन सहाय्यक आयुक्त प्रमोदकुमार काकडे हे लातूर जिल्ह्यातील आशिव येथील रहिवाशी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात झाले आहे. तर पदवीचे शिक्षण एम.एस्सी. ॲग्रीकल्चर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे झाले आहे. त्यांनी आतापर्यंत धाराशिव, सोलापूर, संभाजीनगर, जालना, पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, लातूर या ठिकाणी यापूर्वीही काम केले आहे. त्यांनी धाराशिव येथील सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


 
Top