धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील ज्योती क्रांती बँकेवर 23 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या दुपारी दरोडा टाकून रिव्हॉलवर व चाकूचा धाक दाखवत 1 कोटी 87 लाख 14 हजार रूपये किंमतीचा माल जबरी चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिस विभागाने 9 पथके तयार करून, सीसीटीव्ही व सायबर काईमच्या मदतीने आंतरराज्यीय दरोडेखोऱ्यांच्या टोळींचा शोध लावण्यात धाराशिव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने यश मिळविले आहे. यापैकी 3 दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता 8 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थानिक आरोपीला घेवून या जागेची काही महिने रेकी केली. या रेकीमुळेच सीसीटीव्हीमध्ये आल्याने त्यांचा शोध लागला आल्याची माहिती पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

3 जानेवारी रोजी सायंकाळी पोलिस मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधिक्षक गौहर हसन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांची पूर्ण टीम उपस्थित होते. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दरोडेखोऱ्यांची ही आंतरराज्यीय टोळी असली तरी रेकॉर्डवर एकही आरोपी नाही. त्यामुळे आमच्या 9 पथकाने अहोरात्र मेहनत करून तपास केला. हे आरोपी बसने किंवा रिक्षाने प्रवास करतात. स्वतःचे मोबाईल बंद ठेवतात. त्यामुळे सुराग मिळणे अवघड झाले होते. धाराशिव, तुळजापूर येथील सर्व सीसीटीव्ही तपासल्यानंतर काही पुरावे मिळाले. या प्रकरणात एकूण 7 आरोपी असून,ते तुळजापूर येथील लॉजवर राहिले. बसने धाराशिवला आले. दरोडा टाकल्यानंतर ते रिक्षाने तुळजापूरला गेले. यामध्ये धाराशिव येथील ज्वेलर्स रमेश बळीराम दिक्षीत हा सहभागी असल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिक तपास करता आला. रमेश दिक्षीतकडून दरोडेखोऱ्यांनी नेलेल्या मालापैकी 1 किलो 7 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळाले असून, ते जप्त करण्या आले आहेत. दिक्षीत नंतर उदयन वेलाउदयन वल्लीकालाईल रा. नेरूळ, नवी मुंबई, प्रशांत जालिंदर शिंदे रा. नेरूळ, नवी मुंबई या तिघांना अटक केली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी दिली. 


9 जणांच्या पथकात यांचा समावेश

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, शैलेश पवार, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ, पोलिस हेडकॉस्टेबल अश्विन जाधवर, दिलीप जगदाळे, अमोल निंबाळकर, प्रकाश औताडे, जावेद काझी, वल्ली उल्ला काझी, हुसेन सय्यद, शौकत पठाण, पाडुरंग सावंत, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अशोक ढगारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, घुगे, चौरे, भोसले, गुरव, आरब, महिला पोलिस हेडकॉस्टेबल शैला टेळे, शोभा बांगर, सायबर सेलचे अशोक कदम, सुनिल मोरे यांचा पथकात समावेश होतो.


 
Top