धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील प्रभाग चारमधील नारायण कॉलनी, शिरीन कॉलनी गालीबनगर, रझा कॉलनी, सुलतानपुरा संभाजी नगर शाहूनगर यांच्या या भागात ड्रेनेजच्या गुत्तेदाराने रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर वाहनाचेही नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा प्रशासन आत्या व नगर परिषद प्रशासन आई बाप बनवून ठेकेदाराचे पाळण्यात घालून नामकरण सोहळा आंदोलनं करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
शिवसेना शहर संघटक प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वात प्रभाग चारमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी व नगर परिषदेच्या सीओंना बुधवारी (दि.3) निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 4 मधील ड्रेनेज काम केल्यानंतर रस्ता मजबूतीकरणाचे काम संबंधीत ठेकेदाराने चालू करून दिवाळी सुट्टी निमित्ताने सदर रस्त्याचे अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. सदर निविदेतील अटी व शर्तीनुसार ठेकेदाराने पैसे मिळो अथवा न मिळो निविदेतील अटी व शर्ती नुसारन प प्रशासनानं पैसे न देणे या सबबी खाली काम बंद ठेवणे चुकीचे असून संबंधीत ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.
तसेच शिरीन कॉलनी, रजा कॉलनी, नारायण कॉलनी, सुलतानपुरा शाहू नगर संभाजीराजे नगर येथील रस्ता मजबुतीकरणाचे अर्धवट ठेवल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या सोयीचे की गौरसोयीचे? याबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यावर कोणीही बोलायला तयार नाही तरी सदर अर्धवट सोडलेली कामे तात्काळ सुरु करावीत, तसेच मागील डीपीसीमधील प्रशासकीय मंजुरी झालेले अष्टविनायक चौक ते ठाकरेनगर रोड व अष्टविनायक चौक ते सारनाथ चौक या रोडची निविदा तात्काळ काढून काम सुरु करण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन यांचे बारसे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक प्रशांत साळुंके, नागरिक युनुस मुजावर, सुलतान पठाण, राजू शेख, फरजाना शेख, इस्माईल शेख, मुहाद शेख, शेख सलीम कादरी, साबेरा बेगम, मोहसीन सय्यद, इरशाद शेख, शबाना शेख, महेरुन शेख, शबनम काझी, जरिना सय्यद, शबाना काझी, महेबुबखान पठाण, सरदार मुजावर, सरफराज काझी, फैसल चाऊस, रौफ शेख, खालेद शेख, इस्माईल पठाण, अल्ताफ शेख, एस.एस. कोतवाल, बाबुखाँ पठाण, अजमीरपाशा शेख, जुनेद शेख व इतर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.