धाराशिव (प्रतिनिधी)-येथील अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्यावतीने आयोधेतील श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्व संध्येस 1990 आणि 1992 च्या कारसेवेत सहभागी झालेल्या कारसेवकांचा सत्कार आणि आरोह संगीत अकादमी लातूर प्रस्तुत गीत रामायणचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश गर्गे, जिल्हा मंत्री ॲड. गजानन चौगुले, तसेच रा.स्व.संघ जिल्हा कार्यवाह अजय जानराव, आर. जी. कुलकर्णी, गोविंदराव आयाचीत, हभप. बाबुराव पुजारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हभप. बाबुराव पुजारी यांनी प्रास्ताविक केले. योगेश गर्गे यांनी 1990 आणि 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभुमी आंदोलनातील कारसेवांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. ॲड. मिलिंद पाटील यांनी कारसेवक म्हणून गेल्यानंतरचे स्वतःचे अनुभव सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जवळपास 150 कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरोह संगीत अकादमी लातूरचे कलावंत प्रा. शशिकांत देशमुख आणि त्यांचे सह कलावंत कमलाक्षी कुलकर्णी, शर्वरी डोंगरे, सायली टाक, ईश्वरी जोशी, वेदांती लकशेटे, उन्नती मुंढे, अपूर्वा पाटील, रिदम पाटील यांनी गदिमांच्या गीत रामायण चा बहारदार कार्यक्रम सादर केला. यास साथ संगत संजय सुवर्णकार (तबला), निलेश पाठक (तबला, साईड रिदम), हनुमंत कासलबादे (पखावज), प्रा. शशिकांत देशमुख (संवादिनी) यांनी केली. या कार्यक्रमाचे निरूपण सौ.अश्विनी विश्वास हिरोळीकर तुळजापूर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष राम सोनटक्के यांनी केले.