तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांच्या मनमानी कारभाराप्रकरणी येथील कर्मचाऱ्यांनी थेट आरोग्य तथा पालकमंञी तानाजी सावंत यांच्याकडे निवेदन देवुन या बाबतीत लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

पालक तथा आरोग्य मंञी तानाजी सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, हे  उपजिल्हा रुग्णालय तुळजाभवानी या धार्मिक स्थळी असल्याने  येथे ओ.पी. डी व रुग्णांची संख्या, एम. एल. सी. (मेडीकोलीगल) कामकाज जास्त आहे येथे आधिकारी व कर्मचारी बळ अपुरे असल्याने यामुळे यांच्यावर  कामाचा अतिरीक्त ताण आहे. उपजिल्हा रुगणालय तुळजापूर येथिल वैद्यकीय आधिक्षक हे जाणुनबुजुन शासकीय वेळेव्यतीरीक्त कालावधीत शासकीय सुट्याच्या दिवशी भेट देवून अनावश्यक बाबीवर त्रास देतात व आधिकारी कर्मचारी यांना धारेवर धरतात. वैद्यकीय अधिक्षक हे उपजिल्हा रुगणालयाचा कारभार मनमानी पध्दतीने स्वःताच्या मर्जीने  पध्दतीने चालवण्यवाचा  प्रयत्न करतात. आपल्या आधिपत्याखालील कर्मचाऱ्याच्या आडचणी, समस्या व त्यांनी सुचवलेले निर्णय बिलकुल लक्षात न घेता स्वताचे निर्णय घेतात. यामुळे उपजिल्हा रुगणालय तुळजापूर येथिल आधिकारी व कर्मचारी अतिरीक्त दबावाखाली तणावपुर्ण वातावरणात कामकाज करीत आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्याची मानसीक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे अशाप्रकारच्या मानसीक तणावामुळे दोन अस्थायी वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुगणालय सोडून गेले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय आधिक्षक डॉ. चोरमुले हे 'कार्यरत आधिकारी कर्मचारी यांना दबावाखाली घेवून वांरवार बोलतात. त्याच्याकडुन अतिरीक्त कामासाठी दबाव आणला जातो. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. इनक्रीमीट, पगार या संबंधीच्या धमक्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तरी याचा लवकरात लवकर विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.


नियमानुसार  काम करुन घेणे मनमानी का? -डाँ चोरमले

मी शासन आदेश नियमानुसार  काम करुन घेतो. बायोमँट्रीक चालु केली. फँसिलीटी प्रमाणे रुग्णांवर चांगल्या दर्जाचे उपचार व्हावेत तपासणी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मी बायोमँट्रीक  चालु केली. कार्यालयीन वेळेत येथेच काम करण्याबाबत मी लक्ष दिले. येथे अपेक्षित आँपरेशन सह  योग्य उपचार मिळवेत यासाठी जातीने लक्ष घातले. चुकणां-यांवर कारवाई केली. तसेच येथे अत्याधुनिक साहित्याचा वापर रुग्णांवर उपचार करताना मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले असुन येथे व्हीआयपी मंडळी उपचारसाठी यावेत अशी आरोग्य यंञणा मला उभी करावयाची आहे. मी  प्रभारी अधिकारी नाही कायम अधिकारी असल्याने मी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे सांगितले. या मंडळीच्या कामाचे मुल्यमापन केल्यास मनमानी चालु आहे का काय चालु आहे हे स्पष्ट होईल असे ही यावेळी म्हणाले. काहीना याचा ञास काहीना होत असल्याने ही तक्रार केली गेली असावे असे यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. चोरमोले यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले.


 
Top