भूम (प्रतिनिधी)-मागील 15 वर्षापासून या मतदारसंघाचा विकास ठप्प होता. मी सुत्र हाती घेतल्यापासून मतदारसंघात कायापालट करायचा ठरवला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परिस्थिती काय होती? त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. लोकांच्या प्रश्नाबाबत बघू, करू, पाहतो हे शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीत. जनहिताच्या कामाबाबत मी तातडीने निर्णय घेतो. कंत्राटदारांनी 9 महिन्यात या रूग्णालयाची उभारणी केल्यास कंत्राटदाराला बक्षीस देवू असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. 

भूम येथील ग्रामीण रुग्णालय व बस स्थानक, आलमप्रभू रोड याचे उद्घाटन शुभारंभ साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी पालकमंत्री तानाजी सावंत भूम येथील 50 खाटाचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटन समारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री तानाजीराव सावंत यांनी सर्व लोकांसमोर कंत्राटदराला शब्द दिला.

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रिकर, धनंजय सावंत, दत्ता साळुंखे, गौतम लटके, वैशाली पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, इस्माईल मुल्ला, भूमचे तहसीलदार सचिन खाडे, गोसावी, बालाजी गुंजाळ, निलेश  शेळवणे, विशाल ढगे विशाल अंधारे सुरज गाढवे, बाळासाहेब अंधारे, साहिल गाढवे, दिलीप गाढवे, रामकिसन गव्हाणे, दत्ता मोहिते, सुग्रीव मुरूमकर, संजय साबळे शिवसेना पदाधिकारी, कर्मचारी व महिला भगिनी आदी उपस्थित होते.


 
Top