धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे वरोडा तालुका जिल्हा धाराशिव येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन श्रीमती सुशीलादेवी साळुंखे अध्यापक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांच्या शुभहस्ते झाले.

 यावेळी डॉ. कांबळे म्हणाले की, विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे काम करण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या शिबिराचा पुरेपूर फायदा घेऊन आपली कार्यक्षमता वाढवावी.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.देशमुख म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे स्वयंसेवकातील वेगवेगळे गुण समोर येतात. स्वयंसेवकांना स्वत्वाची जाणीव होते. त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या सुप्तकलागुणांचा विकास करण्याची ही खूप मोठी संधी आहे. या राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वक्तृत्व कौशल्यामुळे मोठ मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत. असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी वरुडा गावातील ग्रामस्थांनी  आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रांजल शिंदे चोबे, प्रमुख उपस्थितीमध्ये मध्ये वरुडा गावच्या सरपंच सौ मीरा खंडेराव गाढवे, उपसरपंच सौ वैशाली सुनील गंगावणे, माजी सरपंच खंडेराव शाम गाढवे, मुख्याध्यापिका सौ डी.बी. रामगुडे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले यांनी केले सूत्रसंचालन प्रा.डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. तर आभार प्राध्यापक मोहन राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील  कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बालाजी नगरे प्रा. श्रीमती स्वाती बैनवाड, प्रा. श्रीमती शिल्पा डोळे, प्रा. श्रीमती स्वाती आकोसकर, प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ. मारुती लोंढे,सर्व सदस्य ,महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top