धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन इतर मागासबहुजन कल्याण विभाग सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव द्वारा आयोजित

धाराशिव जिल्हा वि.जा.भ.ज.आश्रम शाळा क्रीडा महोत्सव 2023-24 दिनांक 18 व 19 जानेवारी 2024 रोजी एकलव्य विद्या संकुल येथे आतिषय खेळी मिळी व आनंदी वातरणात पार पडल्या या क्रीडा महोत्सव मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये 100मी 200मी 400मी 600मी 800मी धावणे व लांब उडी आणि सांख्यिक खेळामध्ये कबड्डी व खो-खो असे विविध प्रकार घेण्यात आले.

व या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश संपादन केला. वैयक्तिक खेळामध्ये 14 वर्ष वयोगट मुले/मुली 100 मी धावणे आशुतोष वाघमारे तृतीय क्रमांक, 200 मी धावणे विजय मुळे प्रथम क्रमांक, 600 मी धावणे अमर जाधव प्रथम क्रमांक, गोविंद चव्हाण तृतीय क्रमांक, अबोली माने प्रथम क्रमांक, लांब उडी अमर जाधव द्वितीय क्रमांक. तर 17 वर्ष वयोगट मुले/मुली  100मी धावणे अश्विनी चव्हाण प्रथम क्रमांक,शितल गायकवाड तृतीय क्रमांक, 200मी धावणे प्रवीण जाधव प्रथम क्रमांक, प्रणिता गाडेकर प्रथम क्रमांक,अश्विनी चव्हाण द्वितीय क्रमांक, 400 मी धावणे ओमकार भोसले प्रथम क्रमांक,कल्पना जाधव तृतीय क्रमांक, 800मी धावणे ओमकार भोसले प्रथम क्रमांक, प्रवीण सुपलकर द्वितीय क्रमांक 

मनीषा राठोड प्रथम क्रमांक, ईश्वरी तेली द्वितीय क्रमांक, लांब उडी कर्ण धनके द्वितीय क्रमांक, निर्गुण गुंडेवार तृतीय क्रमांक, अश्विनी चव्हाण प्रथम क्रमांक

व सांख्यिकी खेळामध्ये 14 वर्ष वयोगट खो-खो मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

17 वर्ष वयोगट खो-खो मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, 14 वर्ष वयोगट कबड्डी मुलांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. 14 वर्ष वयोगट कबड्डी मुलींमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली. आपल्या एकलव्य विद्या संकुलाचे नाव उंचावेल असे काम केले, सर्वं खेळाडूंचे सहाय्य्क संचालक बाबासाहेब अरवत, निरीक्षक युवराज भोसले तसेच अध्यक्ष रामचंद्र वैदू, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, अभय कुलकर्णी, नरेश पोटे, नाना शिर्के, अशोक संकलचा, सतीश कोलगे, राजाभाऊ गिजरेगोविंद सोमाणी तसेच सर्वं संचालक, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे तसेच सर्वं शिक्षक कर्मचाऱ्यांनी व क्रीडा समिती या सर्वांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.


 
Top