उमरगा (प्रतिनिधी)-मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी उमरगा येथील मराठा तरुणांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पायी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी रोजी पायी मुंबईला जाणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. उमरगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठका घेऊन मुंबईला जाणा-या समाजबांधवांची संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे. गणिमी कावा करुन हजारो मराठे मुंबईला जाणार आहेत. तर कांही युवकांनी उमरगा येथून थेट मुंबईपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी (दि.18) सकाळी उमरगा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर अण्णासाहेब पवार, मनोजकुमार जाधव, दिलीप बिराजदार, रोहित पवार, राहुल मानेगोपाळे, लक्ष्मन शिंदे हे मराठा समाजबांधव उमरगा येथून मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाले. त्यांचे सोबत एक टँपोमध्ये पीठ, तांदुळ, स्वयंपाकाचे साहित्य व भांडी, गॅस, शिगडी, आंथरुण, पांघरुण, प्रथोमचाराची पेटीसह टँपो घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करुन निरोप देण्यात आला. यावेळी व्ही. एम. पाटील, शांतकुमार मोरे, किरण गायकवाड, शहाजी पाटील, बाळासाहेब माने, योगेश तपसाळे, शरद पवार, हंसराज गायकवाड, उध्दव मुळे, आरुण जगताप, बाबुराव शहापूरे, शहाजी चालुक्य, उध्दव मुळे, प्रा. सुग्रीव बेंबळगे, जोतिबा शिरगुरे, बंडू पवार, नाना मदनसुरे आदीसह शेकडो सकल मराठा बांधवांनी त्यांना निरोप दिला.


 
Top