भूम (प्रतिनिधी)-येथील तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली असून, महत्वाची बाब म्हणजे जिजाऊ जयंतीनिमित्त तोफेची सलामी शहरातील नागोबा चौकात देऊन फेरीस प्रारंभ करण्यात आला आहे. तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने इतिहासकालीन तोफा आढळून न आल्याने प्रतिष्ठानच्यावतीने पुरंदर किल्ल्याला तोफ भेट देणार आहे.

तुळजाई दुर्गा प्रतिष्ठान मागील 15 वर्षापासून जिजाऊ जयंती शहरात विविध उपक्रमाने साजरी करीत आहे. यावर्षी देखील त्यांनी शहरासह तालुक्यातील शाळेत जाऊन जिजाऊ व गड किल्ले याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. दरम्यान जिजाऊ जयंती निमित्त नागोबा चौक येथून जिजाऊंच्या प्रतिमेची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मूकबधिर शाळेमध्ये विविध खाद्यपदार्थ देण्यात आले. तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्यावतीने पुरंदर किल्ल्यावर मोहीम करण्यात आली होती. दरम्यान कुठेही इतिहासकालीन तोफा आढळून न आल्याने या प्रतिष्ठानच्या वतीने स्व खर्चाने पुरंदर येथील किल्ल्यावर पुरातन तत्वाची मान्यता घेऊन तोफ बसवण्यात येणार आहे. ही तोफ तालुक्यातील गोरमाळा येथील तेजस अवताडे या युवकांनी केवळ वीस दिवसात बनवली आहे. या तोफेची प्रात्यक्षिक देखील जिजाऊ जयंती निमित्त उपस्थित नागरिकांना सादर करण्यात आले. सदरील तोफ छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी पुरंदर किल्ल्यावर भेट म्हणून ठेवण्यात येणार आहे. 

तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्यावतीने आजवर 40 किल्ल्यांना दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यावेळी विठ्ठल बाराते, तानाजी सुपेकर, अनिकेत आकरे, शुभम पवार, तेजस औताडे, अभी सुरवसे, गणेश भोळे, ऋतुराज खानवीलकर, ओमकार पवार, रुपेश औताडे, प्रदीप औताडे, निलेश औताडे, प्रवीण औताडे, किशोर औताडे, शंकर औताडे, सुजित जिकरे, प्रशांत गवळी, ऋषिकेश जिकरे, अमित सुपेकर, महादेव वारे, हर्षद रेवडकर,शुभम शिंदे अतुल वारे  यांच्या सह तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान  भूमचे सभासद उपस्थित होते.


 
Top