भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील वालवड ग्रामपंचायतीने “सक्षम नारी” उपक्रमांतर्गत जिजाऊंच्या जयंती निमित्त गावातील मुलीच्या जन्मानंतर  व लग्नासाठी ‌‘लेक लाडकी माझ्या गावची' व ‌‘कन्यारत्न' योजनांची सुरवात करण्यात आलेली आहे.

नाविन्य पूर्ण योजनांसाठी वालवड ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात.विविध क्षेत्रात यशस्वी यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मान केला जातो. तसेच गावातील आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना प्रत्येकवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना साड्या भेट दिल्या जातात. त्याप्रमाणे आता  गावामध्ये मुलीच्या जन्मानंतर स्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने  ‌‘कन्यारत्न' योजने अंतर्गत 3 हजार रुपये मिळणार आहेत तर मुलीच्या लग्नाला मदत म्हणून ‌‘लेक लाडकी माझ्या गावची' या योजनेंतर्गत 7 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनांच्या लाभासाठी मुलगीचे आई वडील गावचे रहिवाशी असणे बंधनकारक असून मुलीचे लग्नासाठी वय 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. मुलीचा विवाह आईवडिलांच्या मान्यतेने होणे आवश्यक आहे.


समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे व मुलीच्या लग्नासाठी मदत व्हावी या उद्देशाने या योजना ग्रामपंचायतीने सुरु केल्या आहेत.

श्रीमती प्रभावती देवळकर (सरपंच वालवड)


मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी,त्यांच्या लग्नाला हातभार लागावा महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आमच्या मानधन व ग्रामपंचायती निधीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कु.कृष्ण मोहिते (उपसरपंच वालवड)


 
Top