भूम (प्रतिनिधी)-राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय  सावंत व कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पालकमंत्री तानाजीराव सावंत संपर्क कार्यालयात दिनांक 17 जानेवारी रोजी 'जिजाऊ रत्न' पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले .

 सदरील कार्यक्रमाचे आयोजन  प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंचचे अध्यक्ष तथा युवासेना शहरप्रमुख  प्रभाकर बाळासाहेब शेंडगे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लेखिका अलका सपकाळ, ताई लांडे, साधना तावडे, वैशाली उपासे, तारकेश्वरी शिराळकर, रेखाताई लोमटे, डॉ.दुर्गा  खैरे, अपर्णा  हुंबे, रेखा वरळे, रानी शिंदे, अर्चना माने, उषा भारवैशाली, जाधव शुभांगी, सीमा देशमुख, सुनिता माने, विद्या थोरात, कांचन देवकर, पल्लवी माने, माने कोमल, सविता दरंदले, शिल्पा खुणे, जिजाबाई रोकडे, जगताप अश्विनी, संजय गटकळ, राणी शिंदे, अंबिका  जाधव, निशा चंदनशिवे, रोहिणी गपाट, उषा  भारती, वंदना  माने, सुरेखा  लोमटे, अनुराधा आंबुरे, सरस्वती  बोत्रे, सुषमा डोळे या महिलांचा जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी युवा मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top