भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील जि.प. शाळेचा सहभाग असणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मगटविकास अधिकारी श्री सुरेश गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. भूम तालुक्यातील रविंद्र हायस्कूल भूम येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. ही स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार आहे. 

बीटस्तरीय प्रथम व द्वितीय संघ व वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रथम व द्वितीय आलेल्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, थ्रो बॉल, हॉलीबॉल, 100 मीटर, 200 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर धावणे, हार्डल्स, रिले, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक अशा सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा मुले मुली यांचा सहभाग होणार आहे. आज झालेल्या सामन्यात 14 व 17 वयोगटातील कबड्डी या खेळात मुले व मुली मध्ये जि प प्रशाला ईट हा संघ विजयी झाले. तसेच थ्रो बॉल मुले जि प प्रशाला ईट व मुलीमध्ये प्रा.शा, जोतिबाचीवाडी आणि व्हॉलीबॉल मुले व मुली जि.प. प्रशाला ईटचे संघ विजयी ठरले. दि. 18/01/2024 रोजी योगासने बुध्दिबळ, कुस्ती तसेच सर्व मैदानी स्पर्धा भूम येथे तसेच दि 19/01/2024 रोजी खो-खो स्पर्धा चिंचोली येथे घेण्यात येणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात स्थान मिळवणाऱ्या यशोदीप प्रमोद कांबळे याचा गटशिक्षणाधिकारी श्री भट्टी आर सी यांच्या हस्ते सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भट्टी आर. सी. गटशिक्षण अधिकारी यांनी केले. गटविकास अधिकारी सुरेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व आभार कार्यालयीन विस्तार अधिकारी अहमद शेख यांनी केले सूत्रसंचालन कुलकर्णी एस. व्ही. यांनी केले. तर पंच म्हणून अमर सुपेकर व भूम तालुक्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक यांनी पार पाडले. सदर कार्यक्रमास पाटिल मुख्याध्यापक रविंद्र हायस्कूल भूम, भूममधील पत्रकार, खेळाचे पंच, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ञ, विशेष शिक्षक व परिचर यांनी परिश्रम घेतले.


 
Top