भूम (प्रतिनिधी)-शहरात दोन महाराष्ट्र केसरी मल्लांचा फड रंगणार आहे. तर प्रथम कुस्तीस माजी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडून पाच लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी माजी नगरपरिषद अध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गाढवे प्रतिष्ठानच्यावतीने दिनांक 21 जानेवारी रोजी 21 लाखांच्या भव्य कुस्त्याचं फड भरवण्यात आला आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून मोठे मोठे नामांकित पैलवान यांची हजेरी लागणार आहे या निकाली कुस्त्याच्या फडामध्ये दोन महाराष्ट्र केसरी, एक महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख वर्सेस पंजाब केसरी पैलवान भोला पंजाबी यांच्या एक नंबरची कुस्ती जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे सुरज गाढवे, वस्ताद मामू जमादार, बाळासाहेब अंधारे, उद्योजक संजय साबळे यांनी दिली.