धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शनिवारी (दि.20) सकाळी शरदचंद्र पवार यांचे स्वागत करून धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष 2022-23 या दोन वर्षाचा कार्य अहवाल त्यांच्याकडे सादर करण्यात आला.

याप्रसंगी संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्ह्यातील सध्याची दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. तसेच धाराशिव जिल्ह्यातील पक्ष बांधणीसाठी गावभेट अभियान चालू केल्याची माहितीही दिली. तसेच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, अल्पसंख्याक, मागास यांच्यासाठी पक्षाच्या वतीने काम सुरु असल्याचे सांगितले. यावेळी राष्टवादीचे जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, शिवाजी सावंत, नानासाहेब जमदाडे, तामलवाडीचे सरपंच सिकंदर बेगडे, सदस्य सतिश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top