तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदच्या  वसुलीची अर्थिक टक्केवारी कमी असल्याने विशेष वसुली मोहीम राबवुन मार्च 2024 अखेर शंभर टक्के वसुली करावी. तसेच दहा हजार वरील थकबाकी दारांचे वसुली साठी नळकनेक्शन बंद करण्यास हयगय करु नये असे आदेश काढण्यात आले आहेत.

प्रशासकीय कालावधीत नगर परिषदेच्या वसुलीची आर्थीक टक्केवारी कमी असल्याने व प्रत्येक महिन्याच्या मासीक व त्रैमासीक बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी वसुली संदर्भात वसुलीची टक्केवारी कमी असल्याने वेळोवेळी दिलेल्या.सुचनेनुसार वसुलीत सुधारणा होणे कामी कार्यालयामार्फत विशेष वसुली मोहिम राबविण्यात यावी असे सुचविले आहे. त्यानुसार दिनांक 15/01/2024 पासुन दिनांक 31/03/2024 पर्यंत विशेष वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी सात पथके कार्यान्वित केली आहेत.

या विशेष वसुली मोहिमेसाठी विभाग प्रमुख व त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सहाय्यक कर्मचारी नियुक्त्या करण्यात येत आहेत. सदर विशेष वसुली मोहिम अंतर्गत 10,000/- च्या पुढील थकबाकीदाराचे नळ कनेक्शन बंद करणे बाबतचे विशेष अधिकार पथक प्रमुखांना देण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करावी व याबाबत काही तक्रार असल्यास प्राधिकृत अधिकारी यांचेशी संपर्क साधुन पुढील कार्यवाही करणे बाबत मार्गदर्शन घ्यावे.असे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.


 
Top