धाराशिव (प्रतिनिधी)-भवानी चौक, नळेगावकर काँम्लेक्स, सांजा रोड, धाराशिव येथील निरीक्षण व बालगृह येथील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या निराधार मुलांना नळदुर्ग येथे होणाऱ्या बाल क्रीडा महोत्सवात भाग घेण्यासाठी ‘रूपामाता उद्योग समुह' धाराशिवच्या' वतीने स्पोर्ट्स ड्रेस संचालक अँड. अजित गुंड पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
श्री.बाल न्यास मंडळ सदस्य डॉ.ए.डी कदम यांनी बालगृहाच्या कार्यपद्धती विषयी माहिती विषद केली. गुंड यांनी विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत निमित्त तिळगुळाचे वाटप करून, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अंजुमन हेल्थकेअर व वेलफेयर सोसायटीचे संस्थापक फेरोज पल्ला, निरीक्षण गृह शिक्षिका श्रीमती. हरवले मॅडम, शहापुरे आर. के., निवृत्त पोलिस सुरेश गर्जे, गजानन पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.