धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सन 2021/22/ 23/ मध्ये संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अनेक भूमीहीन शेतमजूर,निराधार,अपंग,(संजय गांधी) लाभधारकांचे आर्थिकसह्या मिळण्यासाठी करण्यात आलेले अर्ज किरकोळ (त्रुटी) कारणामुळे नामंजूर करण्यात आलेले आहेत.नामंजूर करण्यात आलेल्या लाभधारकांच्या प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करून तात्काळ मंजूर करण्यात यावे आशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आले.यावेळी निवेदनात म्हटले आहे की,दारिद्य्र रेषेत असणे,अपंगासाठी 50,000 च्या आत तर श्रावणबाळ योजनेसाठी 21,000 रुपयाचे आत उत्पन्न प्रमाणपत्र सादर करा,कुटुंबात सज्ञान मुलगा नसणे,जमीन नसणे,अशी कारणे सांगून काही प्रस्ताव पात्र असताना ते नामंजूर केले आहेत.आतापर्यंत सर्व बैठकामध्ये मंजूर झालेले प्रस्ताव नियमानुसारच करण्यात आलेले आहेत का त्यांना मुलबाळ नाहीत का?असा पण प्रश्न निर्माण होतो.सन 2021 ते 2023 या वर्षातील नामंजूर करण्यात आलेले लाभधारकांच्या तुटीची पूर्तता करून घेऊन ते पुढील बैठकीमध्ये मंजूर करण्यात यावे  आर्थिक साह्याचे प्रस्ताव गरजू लाभधारकांना डावलून शासनाच्या नियमाला बगल देऊन

संबंधित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार यांच्या संगणमताने नियमात न बसणाऱ्या लाभधारकाचे प्रस्ताव मंजूर केले. गोरगरीब, निराधार, अपंग, लाभधारक संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देऊ शकत नसल्यामुळे त्यांचे प्रस्ताव नामंजूर केले नाहीत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार या कामासाठी व (एकवीस हजार) रुपयांच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी दीड हजार ते दोन हजार रुपये दिले तरच उत्पन्न प्रमाणपत्र दिले जाते असे अनेक लाभधारकांकडून सांगण्यात आले आहे. या लाभधारकाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दलालामार्फत पैसे घेऊन कामे केली जातात.

तरी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून तहसील कार्यालयाकडून भूमीहिन शेतमजूर, निराधार,अपंग,लाभधारकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवून नामंजूर झालेल्या लाभधारकाच्या प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करून घेऊन त्वरित मंजूरी देण्यात यावी.तसेच अधिकारी, कर्मचारी,व दलालामार्फत होणारी गोरगरीब लोकांची आर्थिक लूट तात्काळ थांबवण्यात यावी यावेळी निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,धाराशिव तालुकाध्यक्ष संपत सरवदे, विनोद आवतारे, संतोष कांबळे, राजाभाऊ साबळे, जगदीश कोळी, जिंदाशहा फकीर शेख,आदींच्या स्वाक्षर्या आहेत प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


 
Top