तुळजापुर (प्रतिनिधी)-साहित्यकार हा साहित्यातून आपले स्पष्ट विचार प्रगट करीत असतो तो करताना जाती, धर्म, स्त्री, पुरुष समाज याचा विचार न करता तो निर्भीडपणे लिखाण करत असतो असे प्रतिपादन जेष्ट विचारवंत लेखक श्रीपाल सबनीस यांनी स्वातंत्र्य सेनानी कै. भानुदासराव धुरगुडे यांच्या 104 जयंती निमित्ताने आयोजीत लेखक राजकुमार धुरगुडे लिखीत “उत्साहवर्धिनी आमची आई“ व कमलाकर सावंत व राजकुमार धुरगुडे लिखीत “निश्चयाचा महामेरु भानुदासराव धुरगुडे “या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा व शिक्षक साहित्य रत्न व मराठवाडाभूषण आर्दश शिक्षक पुरस्कार व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.
या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी आर्दश मात विमलबाई धुरगुडे होत्या तर उद्योजक राजकुमार धुरगुडे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते लेखक कमलाकर सावंत महेंद्र धुरगुडे विजयालक्ष्मी डोंगरे अदिचि यावेळी प्रमुख उपस्थिती होते. प्रथमता प्रकाशन पुरस्कार व बक्षिस वितरण सोहळा पार पडला
यावेळी बोलताना लेखक श्रीपाल सबणीस म्हणाले कि लेखक विशिष्ट प्रकारची विचारधारा धरून लिखाण करीत असतो व या लिखाणातून साहित्य घडविता असतो.राष्ट्रभक्त पिढी तयार करणे आजच्या काळाची गरज बनली आहे कारण आजच्या पिढीला फक्त देशभक्तांची नावे माहित आहेत परंतु देशभक्ती कशी असावी याबद्दल माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महेंद्र धुरगुडे यांनी केले कार्यक्रमाचा उद्देश उद्योगपती राजकुमार धुरगुडे यांनी विशद केला आभार शैलेश धुरगुडे यांनी मानले तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी ते साठी खंडेराव किसवे , व मराठवाडा समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक वैजनाथ बिराप्पा घोडके तुळजापूर, दगडू शंकरराव रकसाळे नांदेड, वाल्मिकी प्रेमदास राठोड लातूर, संजय हरिपंत पाटील औसा,सौदागर सोपानराव बेवनाळे लातूर, लक्ष्मी करबसप्पा बिराजदार चिवरी तुळजापूर या शिक्षकांना मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संदीप पवार, कवी पंडित कांबळे, किशोर जाधव, चरित्र लेखक प्रमोद हातागळे, कथाकार सुरेंद्र पाटील यांना भानुदासराव धुरगुडे साहित्यरत्न पुरस्कार स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व गौरव ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.