तुळजापूर (प्रतिनिधी) - गावची व्यवस्था पाहण्याचे व विकास करण्याचे काम ग्रामसेवका कडे असुन त्यानंतर ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका रोजगार सेवक पार पाडत असल्याने ग्रामसेवका नंतर रोजगार सेवक गावचा कारभारी असल्याची चर्चा ग्रामीण भागात चर्चिली जात आहे.
शासनाने ग्रामविकास कामे स्थानिक पातळीवर विनाविलंब व्हावेत म्हणून गावात रोजगार सेवक पद निर्माण केले आहे. या रोजगार सेवकाचा हातात गावचा विकास आहे हे म्हटले तरी वावग ठरत नाही. सध्या हिवाळा पार्श्वभूमीवर सर्वञ मनरेगा अंतर्गत गाव पातळीवर विहरी खोदणे पाणंद रस्तेसह अनेक विकास कामे सुरु आहेत. यात महत्त्वाची भूमिका रोजगारसेवकाची आहे सरकार व ग्रामस्थ मधील दुवा हा रोजगार सेवक बनला आहे. रोजगार सेवक हे कायम शाषणाचा सेवेत नाहीत तरी त्यांच्या वर शासनाने ग्रामविकासाची जबाबदारी टाकली आहे सरपंच ग्रामसेवक नंतर रोजगार सेवक हे गावखेड्यात महत्वाचे स्थान बनले आहे. रोजगार सेवक गावतील असल्यामुळे याचा मोठा ग्रामविकासात असतो. गावच्या सगळ्या विकास कामाची चावी रोजगार सेवककडे असते. त्यामुळे तो निस्वार्थी भष्ट्राचारी नसेल तर गावचा विकास होता. तो भष्ट्राचारी निघाला तर माञ गावचा नाश होतो.