भूम (प्रतिनिधी)- येथे नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता 21 लाखांच्या भव्य आणि थरारक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये दोन महाराष्ट्र केसरी मल्ल एकमेकासमोर उभा राहणार आहेत. याशिवाय इतरही महत्त्वपूर्ण कुस्त्या होणार आहे.
ग्रामदैवत आलमप्रभूच्या पायथ्याशी असलेल्या कुस्ती संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती वस्ताद मामू जमादार यांनी दिली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिलेल्या 5 लाख रुपयांच्या बक्षीसासाठी लढत होणार आहे. ती लढत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी भोला पंजाबी (पंजाब) यांच्यात होणार आहे. तर नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या कडून देण्यात आलेल्या 3 लाख रुपये बक्षीसासाठी द्वितीय क्रमांकाची कुस्ती दादा मुलाणी (कुडुवाडी) व आन्ना बिरमले (सेनादल), तृतीय क्रमांकाची कुस्ती मनोज माने (कुडुवाडी) व ऋषिकेश आर्किले (पुणे), बंटीकुमार (खवज पूर (दिल्ली) व अनिल जाधव (विहाळ) यांच्यात होईल. अशा सर्व काही कुस्त्या 21 लाख रुपये बक्षीसाच्या आहेत. भूम शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी माजी. नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असे कुस्तीचे फडाचे आयोजन करण्यात आले. या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून नाही तर देशातून सुद्धा पैलवान हजेरी लावणार आहेत. या शिवाय अन्यही मोठ्या आणि थरारक कुस्त्या होणार आहेत. अशी माहिती संजय गाढवे प्रतिष्ठानच्या सांगण्यात आली. तरी सर्व नागरिकांनी या थरारक अशा कुस्त्यांचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सुरज गाढवे, मामू जमादार, संजय साबळे, बाळासाहेब अंधारे व आयोजकांकडून करण्यात आले आहे.