कळंब (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणाची ज्योत पेटवु,बालविवाह समूळ मिटवू'या विशेष वार्षिक शिबीराचे दि. 24/01/2024 ते 30/01/2024 या कालावधीत लोहटा (प) ता.कळंब जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरचे उदघाटन गुरुवार दि.24 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 11.30 वा.होणार आहे. उदघाटन शिवाजी कापसे (सचिव शि.से.प. चॅ.ट्रस्ट कळंब), डॉ.सोनाली क्षीरसागर(संचालक.रासेयो विभाग डॉ.बा. आ.म.वि.छ.संभाजी नगर), स्वाती संजय आडसूळ(सरंपच लोहटा प.) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य. डॉ.साजेद चाऊस(शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण) असून प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा. संजयजी घुले (सहसचिव,शि.प. चॅ.ट्रस्ट,कळंब), .बाळकृष्ण गुरसाळे(कोषाध्यक्ष,शि.से.प.चॅ.ट्रस्ट,कळंब), रविकांत पवार (उपसरपंच,लोहटा प.), बाबुराव खोसे (तंटामुक्ती अध्यक्ष), संगीता अनपट (मुख्याध्यापक जि.प. शाळा लोहटा प.) तसेच कार्यक्रमाधिकारी  प्रा.ज्योतीराम जाधव, प्रा. सौ.मनिषा कळसकर,  डॉ.महेश पवार, प्रा.अमोल शिंगटे, प्रा.विनायक मिटकरी व कु.गायत्री चोंदे (एन.एस.एस.विद्यार्थी प्रतिनिधी) यांच्या उपास्थितीत होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थानी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित रहावे, असे आव्हान प्राचार्य यांनी केले.


 
Top