धाराशिव (प्रतिनिधी)-पोलिस अधिक्षकांच्या सुचनेनंतर डीजेचा आवाज प्रमाणापेक्षा अधिक केल्याने संदल मिरवणुकीतील 16 डीजे चालकांवर वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई केली.
यात सोलापूर, सांगली, पुणे, सातारा येथील सर्वाधिक डीजे चालकांचा समावेश आहे. शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरूसानिमित्त संदलमधील मिरवणुकीतील 16 डीजेवर कारवाई केली. यातील एका डीजेवर न्यायालयात खटला दाखल केला. 15 डीजेसह वाहन जप्ती, आरटीओची कारवाई व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबद्दल न्यायाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.