धाराशिव (प्रतिनिधी)-महायुतीमध्ये लोकसभा निवडणूक जागे वाटपबाबत चर्चेची पहिली फेरी संपली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यात धाराशिवसह लोकसभेचा 12 जागा मागितल्या आहेत. या निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून संधी दिल्यास निवडणुकीसाठी मी पण इच्छुक आहे असे मत मराठवाडा पदवीधर मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांनी पु. वि. लोकराज्यशी बोलताना सांगितले. 

लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात का या संदर्भात विचारल्यानंतर आमदार काळे यांनी राज्यपातळीवर राज्यातील लोकसभा निवडणूक जागे वाटपाबाबत चर्चेची पहिली फेरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यात एकूण लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागा मागितल्या आहेत. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद असेल त्या पक्षाला तेथील उमेदवारी देण्याचे फायनल झाले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगली ताकद आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे चिन्ह आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा या दोन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मला पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे असे स्पष्ट मत आमदार विक्रम काळे यांनी बोलताना सांगितले. 

विशेष म्हणजे आमदार विक्रम काळे यांचे पळसप गाव धाराशिव तालुक्यात आहे. तर त्यांच्या शिक्षण संस्था लातूर जिल्ह्यात असल्यामुळे ते लातूर जिल्ह्यात सक्रीय कार्यरत आहेत. 


 
Top